Monday, May 31, 2021

Work From Home - The new normal

            २०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच वेगळं होतं .  बाहेर जाणं  बंद झालं आणि त्या नंतर काम करायच्या पद्धतीत खूप बदल झाले. घरून काम करणे [ Work  from  home ] हा पर्याय आवडो किंवा न आवडो सगळ्यांना ते स्वीकारावं लागलं. 

            जेव्हा तुम्ही घरातून काम करता तेव्हा साहजिकच ऑफिस मध्ये जसं  काम होतं  तसं  शक्य नसतं . समोर सहकारी नसतात. वरिष्ठ नसतात. घरच्यांचा व्यत्यय असतो.  अश्या परिस्थितीतही कामाचा दर्जा टिकवून ठेवणं हे खरंच अवघड आहे. मी Amazon , Tech  Mahindra , C-DAC आणि आता Infosys  या नामवंत कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. आपलं काम घरातून  चांगलं सुरु ठेवायला मानसिक आणि शारीरिक तयारी लागते. त्याच बरोबर काम करण्यासाठी लागतात Work  From  Home  Essentials. तर मी माझं काम चांगल्या पद्धतीने चालू ठेवण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू वापरतो आणि त्याचा कामात मला कसा उपयोग होतो हे आज सांगणार आहे. 


सगळ्यात आधी घरातून काम करायची एक जागा ठरवा  आणि रोज त्याच वेळेला आणि त्याच ठिकाणी कामाला  बसा. मी रोज १०-७ ह्या वेळेत आणि एकाच ठिकाणी बसून काम करतो. 


हातात हे MI  च घड्याळ घालतो. ते मला दर  ४५ मिनिटांनी  "time to move" म्हणजे मी ४५ मिनिटांपेक्षा जास्त हालचाल न करता बसलोय हे सांगतं. हे दिसलं  कि मी उठून एक चक्कर मारून येतो   



       

 हे  दोन्हीही accu-pressure करण्यासाठी वापरतो. बऱ्याचदा आपण मीटिंग मध्ये असतो. काही काम नसतं लक्ष पूर्वक ऐकण्याशिवाय. अश्या वेळी मी ह्यांचा वापर करतो. 


                                                    





भगवतगीता मला खूप प्रिय आहे. मी आत्तापार्येंत खूप वेळा वाचली आहे. लहानपणी मी आपटे गुरुजींकडून गीता शिकत असताना माझ्या वडिलांनी मला हि दिली होती. तेव्हापासून हि माझ्या जवळ असते. 


                                हि समोर ठेवली आणि वेळ मिळाला कि एक एक श्लोक वाचत राहायचे. 

                     


जवळच गोंदवलेकर महाराजांचा फोटो.  कामाची सुरुवात आणि शेवट त्यांना नमस्कार करून


 


 



 हे दिसायला एक फुल आहे पण आहे Pen . मला एकाने दिलेली भेटवस्तू. हि माझ्या कामाच्या ठिकाणी असते. दिसायलाही चांगलं दिसत आणि पेन म्हणून वापरता येतं 






 


 mouse  हि अत्यंत गरजेची गोष्ट. wireless  mouse  वापरल्यामुळे वायर चा गर्द  कमी होतो 





हे मला सिंबायोसिस कॉलेज ने दिलेलं आहे. ह्यात घड्याळ आणि पेन दोन्ही आहे. 


  बऱ्याचदा चहा कामाच्या  जागेवरच बसून पितो त्यामुळे हे गरजचे आहे. शिवाय पाण्याची बाटली पण ह्यावरच ठेवता येते 


                                                                Paperweight on notepad


                            लॅपटॉप एका डोळ्याच्या विशिष्ट उंचीवर असल्याने पाठीतून वाकावं लागत नाही 


छोट्या जागेत मावणारे नोटपॅड खूप कामात येते. मीटिंग मधल्या गोष्टी पटकन टिपू शकतो. शिवाय इतर गोष्टी ज्या काम करताना आठवतात त्या ह्यात लिहून नंतर करू शकतो. 


                        हि खुर्ची मी घरून काम करण्यासाठी घेतली आहे. पाठ आणि कंबर सरळ राहते. 


                                    मोठ्या आवाजाचा दुसर्यांना त्रास होऊ नये म्हणून हे हेडफोन्स 




                        लॅपटॉप चा स्पीकर लवकर खराब होऊ नये म्हणून हा ब्लूटूथ ने चालणार स्पीकर 






                        जेव्हा कोडींग आणि टायपिंग खूप आहे तेव्हा हा कीबोर्ड खूप कामाला  येतो 



                                                लॅपटॉप ची उंची वाढण्यासाठी हे स्टॅन्ड 

मीटिंग चे reminders सांगण्यासाठी आणि काम करता करता संगीत ऐकण्यासाठी आणि इतर बऱ्याच वापरासाठी alexa  

                                    ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं घरातून काम लवकर आणि मजेत होतं  



Sunday, May 23, 2021

गौर गोपाल दास आणि मी

                 काल  abp माझा वर माझा कट्टा हा कार्यक्रम बघत होतो. गेले दोन आठवडे हा कार्यक्रम आवर्जून बघत आहे. मागील भागात संगणक तज्ञ भटकर सर आले होते. ह्या भागात प्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल  दास. कार्यक्रम बघून मी दहा वर्ष जुन्या आठवणीत गेलो. २०११ साल. मुंबई. 

                प्रथमतः मला सर्व इस्कॉन मधल्या मार्गदर्शक प्रभूंची माफी मागावी वाटते. जसा काळ पुढे जातो तसं  आपणही पुढे जात जातो आणि लोकांचा संपर्क तुटून जातो. मी आज कोण्याच्याही संपर्कात नसलो तरी सगळ्याची आठवण नेहमी येते आणि वेळ प्रसंगी मी आठवण काढतोही. व्रज कीर्ती दास, गौर गोपाल दास, अमोघ लीला दास या सगळ्यांची साथ आणि त्यांनी दिलेली शिकवण नेहमी सोबत आहेच. 

            हि गोष्ट आहे २०११ मधील. जेव्हा मी मुंबई येतील शासकीय तंत्रणालायात अणुरेणू अभियांत्रिकी शिकत होतो. दुसऱ्या वर्षी वडिलांची बदली यवतमाळला झाली आणि आमचं घर सोडून मला J.J.  हॉस्टेल ला दाखला घ्यावा लागला. 

        J.J.  हॉस्टेल ला एक रिकामी खोली आहे. तिथे मी भगवे वस्त्र धारण केलेल्या एका व्यक्तीला पाहिलं. हातात भगवतगीता आणि सोबत ४-५ मुलं होस्टेलमधली. कुतुहूल म्हणून मी हि गेलो. तिथे भगवत्गीतेचा श्लोक सुरु होता. 

        लहानपणापासून भगवतगीता मला खूप प्रिय आहे. मिरज येथील आपटे गुरुजींनी निशुल्क आणि मनापासून आशीर्वाद देत आम्हाला भगवतगीता शिकवली. प्रत्येक श्लोक मला आणि दीदीला कंठस्थ व्हावा असा त्यांचा मानस होता. इथेही गीतेचे श्लोक ऐकून मी मांडी घालून बसलो. व्रज कीर्ती दास प्रभू आणि त्याच्या सोबत एक ब्रह्मचारी गीता वाचत होते. इस्कॉन च्या समाजउपयोगी उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे. श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरातून ब्रह्मचारी कृष्णभवनामृत संघाचा प्रचार करण्यासाठी वेग वेगळ्या ठिकाणी जातात. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा म्हणून होस्टेलला खिचडीचा प्रसाद आणि गोड मिठाई घेऊन यायचे. त्या प्रसादाची चवच वेगळी. 


        मलाही भगवत्गीतेची आवड आणि स्वादिष्ट प्रसाद मिळू लागला आणि मी दर शुक्रवारी न चुकता जाऊ लागलो. हळू हळू माझ्या सोबत माझे मित्र सुमित आणि केवल सामील झाले. आमची मैत्रीही इस्कॉन मुळेच घट्ट होत गेली. आमचा उत्साह पाहून व्रज कीर्ती दास प्रभूंनी  मंदिरात बोलवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी वांद्रे ते चर्नी  रोड लोकल ट्रेन ने आम्ही जाऊ लागलो.  दर रविवारी भागवत कथा आणि तेथेच प्रसाद घेऊन आम्ही तिघे हॉस्टेल ला परत यायचो. १६-१८ वर्षांचे आम्ही मुलं आणि आमच्या अध्यात्मिक प्रश्न दोघांनाही चांगलं खत पाणी मिळत होत. 

            गौर गोपाल दास ह्यांना मी त्याच दरम्यान पाहिलं आणि त्यांच्याशी ओळख झाली. आज जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढे तेव्हा नव्हते. प्रेरणा नावाचा  एक उत्सव श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात सुरु होता. Titanic  - Learnings  from  it. गौर गोपाल दास ह्यांच्या बोलण्याच्या शैली मुले आज ते तरुणाचे प्रतिनिधित्व करतात. 




            मंदिर आणि आश्रमात नेहमी जाऊ लागल्यामुळे तिथल्या कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभाग घेता यायचा. अश्याच एका उपक्रमात मला सहभागी होता आलं. ते म्हणजे " वृंदावन - मथुरा- बारासना " यात्रा. मंदिराने विध्यार्थ्यांना सवलतीच्या दारात सर्व व्यवस्था करून दिली. साधारण आम्ही ३० जणांचा समूह होतो. गौर गोपाल दास ह्यांचा सहवास ह्या यात्रेत भरपूर मिळाला. कुठे जायचं, काय करायचं, काय नाही करायचं याच्या सर्व सूचना त्यांनी दिल्या. गोवर्धन परिक्रमा आम्ही चालत आणि एका दिवसात " हरे कृष्णा" महामंत्र जपत पूर्ण केली. त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची अध्यात्मिक ऊर्जा आहे. जाताना त्यांनी सांगितले " बाबांनो  रोज माळ घेऊन जप करणे कधीच सोडू नका "  





https://en.wikipedia.org/wiki/Gaur_Gopal_Das

https://www.youtube.com/channel/UCz22l7kbce-uFJAoaZqxD1A

https://www.instagram.com/gaurgopaldas/?hl=en

आजही त्याचे youtube , instagram आणि फेसबुक वर व्हिडीओ बघत असतो आणि शिकत असतो. 

त्यांनी नंतर लेखनाला सुरुवात केली. त्याच पुस्तकही मी kindle आवृत्तीवर वाचून काढलं.

https://gaurgopaldas.com/ काल परवाच त्यांच्या संकेतस्थळही भेट दिली