काल abp माझा वर माझा कट्टा हा कार्यक्रम बघत होतो. गेले दोन आठवडे हा कार्यक्रम आवर्जून बघत आहे. मागील भागात संगणक तज्ञ भटकर सर आले होते. ह्या भागात प्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास. कार्यक्रम बघून मी दहा वर्ष जुन्या आठवणीत गेलो. २०११ साल. मुंबई.
प्रथमतः मला सर्व इस्कॉन मधल्या मार्गदर्शक प्रभूंची माफी मागावी वाटते. जसा काळ पुढे जातो तसं आपणही पुढे जात जातो आणि लोकांचा संपर्क तुटून जातो. मी आज कोण्याच्याही संपर्कात नसलो तरी सगळ्याची आठवण नेहमी येते आणि वेळ प्रसंगी मी आठवण काढतोही. व्रज कीर्ती दास, गौर गोपाल दास, अमोघ लीला दास या सगळ्यांची साथ आणि त्यांनी दिलेली शिकवण नेहमी सोबत आहेच.
हि गोष्ट आहे २०११ मधील. जेव्हा मी मुंबई येतील शासकीय तंत्रणालायात अणुरेणू अभियांत्रिकी शिकत होतो. दुसऱ्या वर्षी वडिलांची बदली यवतमाळला झाली आणि आमचं घर सोडून मला J.J. हॉस्टेल ला दाखला घ्यावा लागला.
J.J. हॉस्टेल ला एक रिकामी खोली आहे. तिथे मी भगवे वस्त्र धारण केलेल्या एका व्यक्तीला पाहिलं. हातात भगवतगीता आणि सोबत ४-५ मुलं होस्टेलमधली. कुतुहूल म्हणून मी हि गेलो. तिथे भगवत्गीतेचा श्लोक सुरु होता.
लहानपणापासून भगवतगीता मला खूप प्रिय आहे. मिरज येथील आपटे गुरुजींनी निशुल्क आणि मनापासून आशीर्वाद देत आम्हाला भगवतगीता शिकवली. प्रत्येक श्लोक मला आणि दीदीला कंठस्थ व्हावा असा त्यांचा मानस होता. इथेही गीतेचे श्लोक ऐकून मी मांडी घालून बसलो. व्रज कीर्ती दास प्रभू आणि त्याच्या सोबत एक ब्रह्मचारी गीता वाचत होते. इस्कॉन च्या समाजउपयोगी उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे. श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरातून ब्रह्मचारी कृष्णभवनामृत संघाचा प्रचार करण्यासाठी वेग वेगळ्या ठिकाणी जातात. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा म्हणून होस्टेलला खिचडीचा प्रसाद आणि गोड मिठाई घेऊन यायचे. त्या प्रसादाची चवच वेगळी.
मलाही भगवत्गीतेची आवड आणि स्वादिष्ट प्रसाद मिळू लागला आणि मी दर शुक्रवारी न चुकता जाऊ लागलो. हळू हळू माझ्या सोबत माझे मित्र सुमित आणि केवल सामील झाले. आमची मैत्रीही इस्कॉन मुळेच घट्ट होत गेली. आमचा उत्साह पाहून व्रज कीर्ती दास प्रभूंनी मंदिरात बोलवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी वांद्रे ते चर्नी रोड लोकल ट्रेन ने आम्ही जाऊ लागलो. दर रविवारी भागवत कथा आणि तेथेच प्रसाद घेऊन आम्ही तिघे हॉस्टेल ला परत यायचो. १६-१८ वर्षांचे आम्ही मुलं आणि आमच्या अध्यात्मिक प्रश्न दोघांनाही चांगलं खत पाणी मिळत होत.
गौर गोपाल दास ह्यांना मी त्याच दरम्यान पाहिलं आणि त्यांच्याशी ओळख झाली. आज जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढे तेव्हा नव्हते. प्रेरणा नावाचा एक उत्सव श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात सुरु होता. Titanic - Learnings from it. गौर गोपाल दास ह्यांच्या बोलण्याच्या शैली मुले आज ते तरुणाचे प्रतिनिधित्व करतात.
मंदिर आणि आश्रमात नेहमी जाऊ लागल्यामुळे तिथल्या कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभाग घेता यायचा. अश्याच एका उपक्रमात मला सहभागी होता आलं. ते म्हणजे " वृंदावन - मथुरा- बारासना " यात्रा. मंदिराने विध्यार्थ्यांना सवलतीच्या दारात सर्व व्यवस्था करून दिली. साधारण आम्ही ३० जणांचा समूह होतो. गौर गोपाल दास ह्यांचा सहवास ह्या यात्रेत भरपूर मिळाला. कुठे जायचं, काय करायचं, काय नाही करायचं याच्या सर्व सूचना त्यांनी दिल्या. गोवर्धन परिक्रमा आम्ही चालत आणि एका दिवसात " हरे कृष्णा" महामंत्र जपत पूर्ण केली. त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची अध्यात्मिक ऊर्जा आहे. जाताना त्यांनी सांगितले " बाबांनो रोज माळ घेऊन जप करणे कधीच सोडू नका "
https://en.wikipedia.org/wiki/Gaur_Gopal_Das
https://www.youtube.com/channel/UCz22l7kbce-uFJAoaZqxD1A
https://www.instagram.com/gaurgopaldas/?hl=en
आजही त्याचे youtube , instagram आणि फेसबुक वर व्हिडीओ बघत असतो आणि शिकत असतो.
त्यांनी नंतर लेखनाला सुरुवात केली. त्याच पुस्तकही मी kindle आवृत्तीवर वाचून काढलं.
https://gaurgopaldas.com/ काल परवाच त्यांच्या संकेतस्थळही भेट दिली

No comments:
Post a Comment